विराट कोहलीचा नेतृत्वातील भारताचा वरिष्ठ संघ इंग्लंडमध्ये असताना, भारताचा एक युवा संघ श्रीलंका दौऱ्यावर पोहोचला आहे. या संघाचे नेतृत्व अनुभवी सलामीवीर शिखर धवनच्या हाती देण्यात आले असून, दिग्गज भारतीय फलंदाज राहुल द्रविड या संघाचा मुख्य प्रशिक्षक असेल. या दौर्यावर भारतीय संघाला तीन सामन्यांची वनडे आणि तीन टी२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्याचवेळी, श्रीलंका येथे पोहोचल्यानंतर भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड याने पत्रकारांना सामोरे जाताना आपली प्रतिक्रिया दिली.
“आम्ही जिंकण्यासाठी आलोय”
भारतातून श्रीलंकेला प्रयान केल्यानंतर भारतीय संघ श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे पोहोचला. तेथे पोहोचल्यानंतर संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड याने पत्रकारांना सामोरे जाताना म्हटले, “या दौर्याची पहिली प्राथमिकता मालिका जिंकणे होय. त्याचवेळी, विश्वचषक स्पर्धेसाठी संघ जवळजवळ निश्चित आहे. तरी संघातील २-३ जागा रिक्त आहेत. अशा परिस्थितीत युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीने विश्वचषकात आपले स्थान निश्चित केले पाहिजे. मात्र, मालिका जिंकणे हे संघाचे लक्ष्य आहे. मी पहिल्या दोन सत्रात खेळाडूंना सांगितले आहे. मालिका जिंकण्याच्या उद्देशाने खेळाडूंना मैदानात उतरावे लागेल.”
राहुल द्रविड प्रथमच राष्ट्रीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणत्याही दौऱ्यावर जात आहे.
द्रविडप्रमाणे प्रथमच भारतीय संघाचा कर्णधार झालेला शिखर धवन म्हणाला, “भारतीय संघाचा कर्णधार होणे हा माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षणाखाली बांगलादेशविरूद्ध मी भारत अ संघाचे नेतृत्व केले होते. मला वाटते की, माझे आणि द्रविड यांचे समान विचार आहेत. श्रीलंका दौर्यावर मालिका जिंकण्याचे आमचे लक्ष्य आहे.”
हा दौरा १३ जुलैपासून सुरू होईल. सर्व सामने हे कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळले जातील.
श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ-
शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शाॅ, देवदत्त पड्डिकल, ऋतुराज गायकवाड, सुर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), राहुल चाहर, के गाॅथम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुनवेश्वर कुमार (उपकर्णधार) दिपक चाहर, नवदीप सैनी, चेतन सकरिया
महत्त्वाच्या बातम्या:
ब्रेकिंग! २०२१ टी२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर, या तारखेपासून होणार सामन्यांना सुरुवात
अहो अश्चर्यम! अमेरिकेच्या फ्लॉयड मेवेदरने एका ‘खोट्या’ सामन्यातून कमावले तब्बल ७४३ कोटी