24 वर्षीय फिरकीपटूनं रचला इतिहास! बुमराह-कुलदीप-हार्दिक सर्वांना टाकलं मागे

भारतीय संघाचा युवा फिरकीपटू रवी बिश्नोईला बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली

तो अर्शदीप सिंगच्या जागी संघात आला आणि त्यानं 4 षटकांत 30 धावा देऊन सर्वाधिक 3 विकेट घेतल्या

यासह बिश्नोईनं टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये 50 बळी पूर्ण केले आहेत. त्यानं वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी हा टप्पा गाठला

बिश्वोई आता भारतासाठी टी20 मध्ये 50 विकेट पूर्ण करणारा सर्वात युवा गोलंदाज बनला आहे. त्यानं 24 वर्ष 37 दिवस वयात ही कामगिरी केली

याबाबतीत बिश्नोईनं अर्शदीप सिंगचा रेकॉर्ड मोडला. अर्शदीपनं 24 वर्ष 196 दिवस वयात टी20 मध्ये 50 विकेट घेतल्या होत्या

यानंतर या लिस्टमध्ये जसप्रीत बुमराहचा क्रमांक लागतो. त्यानं 25 वर्ष 80 दिवस वयात ही कामगिरी केली होती.

हार्दिक पांड्यानं 28 वर्ष 295 वयात टी20 मध्ये 50 विकेट पूर्ण केल्या होत्या