कसोटीमधील रिषभ पंतचे हे 5 मोठे विक्रम मोडणे जवळपास अशक्य
टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत 4 ऑक्टोबर रोजी 27 वर्षांचा झाला
तो सध्या शानदार फार्मात आहे. त्यानं नुकत्याच झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत शतक ठोकलं होतं
रिषभ पंतनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी शानदार कामगिरी केली आहे. या दरम्यान त्यानं अनेक रेकॉर्ड्स देखील आपल्या नावे केले
1) पंत कसोटीमध्ये भारतासाठी सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारा फलंदाज आहे. त्यानं 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्ध अवघ्या 28 चेंडूत 50 धावा केल्या होत्या
2) एका कसोटीत सर्वाधिक खेळाडूंना बाद करणाऱ्या यष्टीरक्षकांमध्ये तो रॉबर्ट रसेल (इंग्लंड) आणि एबी डिव्हिलियर्स (द. आफ्रिका) सोबत संयुक्तपणे अव्वल स्थानी आहे
पंतनं डिसेंबर 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ॲडलेड कसोटीत 11 झेल घेतले होते
3) पंत कसोटीत सर्वात वेगवान 100 बळी घेणारा भारतीय यष्टीरक्षक आहे. त्यानं 26 कसोटीत ही कामगिरी केली. धोनीनं यासाठी 36 सामने खेळले होते
4) पंत कसोटीमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणारा भारतीय यष्टीरक्षक आहे. त्यानं जुलै 2022 मध्ये 89 चेंडूत 100 धावा केल्या होत्या
5) पंत इंग्लंडमध्ये कसोटी आणि वनडे शतक ठोकणारा पहिला आशियाई यष्टीरक्षक आहे. याशिवाय तो ऑस्ट्रेलियात शतक ठोकणारा एकमेव भारतीय यष्टीरक्षक आहे