हा कसला किंग? 2 वर्षांपासून कसोटीत एकही अर्धशतक नाही!
पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम बऱ्याच काळापासून फॉर्मसाठी झगडत आहे. तो इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत देखील फ्लॉप झाला
या सामन्यातील पहिल्या इनिंगमध्ये 556 धावा करून देखील पाकिस्तानचा एक डाव आणि 47 धावांनी दारूण पराभव झाला
फलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या या खेळपट्टीवर भरपूर धावा बनल्या. मात्र बाबर आझम दोन्ही डावात अपयशी ठरला
बाबरनं कसोटीच्या पहिल्या डावात 71 चेंडूत 30 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात तो 15 चेंडूत फक्त 5 धावा करून बाद झाला
बाबर आझम कसोटीत जवळपास 2 वर्षांपासून 50 पेक्षा अधिक धावा करू शकलेला नाही
त्यानं डिसेंबर 2022 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 161 धावा ठोकल्या होत्या. या त्याच्या कसोटीतील शेवटच्या 50 हून अधिक धावा आहेत
बाबरनं गेल्या 18 कसोटी डावांमध्ये फक्त 366 धावा केल्या, ज्यात त्याचा सर्वाधिक स्कोर 41 आहे
या सततच्या खराब कामगिरीमुळे त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे