आयपीएलच्या एका सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज

आयपीएलच्या एका सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज

मुरली विजयने आयपीएलच्या एका डावात 11 षटकार ठोकले होते. 2010 मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्याने हा पराक्रम केला होता.

सनथ जयसुर्याने आयपीएल 2008 मध्ये मुंबईकडून खेळताना सीएसकेविरुद्ध 11 षटकार ठोकले होते.

आरसीबीकडून खेळताना आयपीएल 2016 मध्ये एबी डिविलियर्सने गुजरात लायन्सविरुद्ध एका सामन्यात 12 षटकार मारले होते.

आरसीबीकडून खेळताना 2015 मध्ये ख्रिस गेलने पंजाबविरुद्ध 12 षटकार मारले होते.

2012 साली आरसीबीकडून खेळताना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 13 षटकार मारण्याचा पराक्रम ख्रिस गेलने केला होता.

ब्रेंडन मॅक्युलम एका डावात सर्वाधिक षटकार ठोकणारे दुसरे फलंदाज आहेत. त्यांनी 2008 मध्ये केकेआरकडून खेळताना आरसीबीविरुद्ध 13 षटकार मारले होते.

आयपीएलच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने आरसीबीकडून खेळताना 2013 मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध 17 षटकार ठोकले होते.