"भारताकडून शिका", पाकिस्तानच्या हिंदू क्रिकेटरचे आपल्याच टीमला खडे बोल

दानिश कनेरिया हा पाकिस्तानचा तो क्रिकेटपटू आहे, ज्यानं अल्पसंख्यक असून देखील संघात जागा मिळवली आणि बरेच वर्ष देशाची सेवा केली

दानिश नेहमीच पाकिस्तानच्या संघावर टीका करतो. आता त्यानं चॅम्पियन्स वनडे कपच्या आयोजनावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला खडे बोल सुनावले आहेत

दानिशच्या म्हणण्यानुसार, बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर पाकिस्तानला या 50 षटकांच्या स्पर्धेचं आयोजन करण्याची आवश्यकता नव्हती

दानिशनं आपल्या युट्यूब चॅनलवर म्हटलं की, जर पाकिस्तान अशाप्रकारे कसोटी ऐवजी वनडे क्रिकेटला प्राधान्य देत राहिला, तर संघ कसोटीतही 50 ओव्हरच खेळू शकेल

माजी लेग स्पिनर म्हणाला, "तुम्ही कसोटी संघ उभा करू शकत नाही. तुम्ही या फॉरमॅटमध्ये संघर्ष करत आहात. आता तुम्ही वनडे स्पर्धा आयोजित केली"

दानिश पुढे म्हणाला की, त्याला वाटत नाही पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं कसोटी क्रिकेट सुधारण्यासाठी काही पावलं उचलली आहेत

तो म्हणाला, "पाकिस्ताननं भारताकडून शिकायला हवं. दुलीप ट्रॉफीमध्ये 4 संघ खेळत आहेत. सर्व स्टार खेळाडू यात सहभागी झाले, जे कसोटी क्रिकेटची तयारी करत आहेत

दानिश कनेरियानं पाकिस्तानसाठी 61 कसोटी सामने खेळले, ज्यात त्यानं 261 विकेट घेतल्या आहेत