एमएस धोनीचा वीस वर्षे जुना विक्रम थोडक्यात हुकला.. या खेळाडूने केली बरोबरी

राजस्थान रॉयल्सचा यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल सध्या दुलीप ट्रॉफी 2024 मध्ये भारत 'ब' संघासाठी शानदार कामगिरी करत आहे

जुरेलने पहिल्या सामन्यात भारत अ संघाविरुद्ध शानदार कामगिरी करत महेंद्रसिंग धोनीच्या वीस वर्ष जुन्या विक्रमाची बरोबरी केली आहे

हा रेकाॅर्ड दुलीप ट्रॉफीच्या एका सामन्यात सर्वाधिक झेल घेण्याचा आहे. जुरेलने 7 झेल घेऊन माजी भारतीय कर्णधार धोनीची बरोबरी केली आहे

धोनीने 2004-05 मध्ये इस्ट झोनकडून खेळताना ही कामगिरी केली, त्याने त्यावेळी मध्य विभागाच्या संघाविरुद्ध धडाकेबाज कामगिरी केली