एकेकाळी आयपीएलची मोठी ऑफर नाकारली, आता खाजगी कंपनीत नोकरी करतो हा क्रिकेटर
ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज नॅथन ब्रेकन त्याचे लांब केसं आणि स्विंग होणाऱ्या चेंडूसाठी ओळखला जायचा
मात्र आता त्याचे लांबसडक केस छोटे झाले असून त्याला चष्माही लागला आहे
6 फूट 4 इंचाच्या या वेगवान गोलंदाजानं 2011 मध्ये गुडघ्याच्या दुखापतीमुळे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली
नॅथन ब्रेकननं ऑस्ट्रेलियासाठी 5 कसोटी, 116 वनडे आणि 19 टी20 सामने खेळले
वनडेत त्याच्या नावे 174 विकेट आहेत. त्यानं आपल्या 60व्या वनडे सामन्यातच 100 विकेटचा आकडा गाठला होता
मात्र आता 46 वर्षीय ब्रेकन सिडनी येथील एका कंपनीत अकाउंट मॅनेजर म्हणून काम करतो
2011 मध्ये ब्रेकनला आरसीबीनं 1.3 कोटी रुपयांना खरेदी केलं होत, मात्र त्यानं खेळण्यास नकार दिला होता