आधी संघातून बाहेर, मग केंद्रीय करारातूनही सुट्टी; 'हा' खेळाडू होऊ शकतो रिटायर

आधी संघातून बाहेर, मग केंद्रीय करारातूनही सुट्टी; 'हा' खेळाडू होऊ शकतो रिटायर

फखर जमान गेल्या आठ वर्षांपासून पाकिस्तान क्रिकेट संघाचा अविभाज्य भाग होता, परंतु अलीकडेच त्याला पीसीबीच्या केंद्रीय करार यादीतून काढून टाकण्यात आले आहे.

फिटनेस चाचणीत उत्तीर्ण न होणे आणि बाबर आझमला वगळल्यानंतर निवड समितीच्या निर्णयावर टीका करणे हे त्याचे केंद्रीय यादीतून वगळण्याचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे.

झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकांसाठीही फखर जमानही निवड करण्यात आलेली नाही.

पीसीबी आणि निवडकर्त्यांसोबतच्या वादामुळे फखरवर मानसिक दबाव निर्माण झाला असून तो मोठा निर्णयही घेऊ शकतो, असे म्हटले जात आहे.