सोनी-हॉटस्टारवर दिसणार नाही भारत-बांगलादेश मालिका, या चॅनलवर पाहा फ्री!

भारत आणि बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे

मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या चेपॉक मैदानावर, तर दुसरा सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्कवर खेळला जाईल

यानंतर दोन संघात 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाईल. पहिला सामना 6 ऑक्टोबर, दुसरा 9 ऑक्टोबर आणि तिसरा सामना 12 ऑक्टोबरला खेळला जाईल

भारत-बांगलादेश मालिकेचं थेट प्रक्षेपण स्टार नेटवर्क किंवा डिस्नी हॉटस्टारवर होणार नाही. तसेच याची स्ट्रिमिंग सोनी लिव्ह वर देखील होणार नाही

भारत-बांगलादेशमध्ये होणाऱ्या या दोन्ही मालिकांचं थेट प्रक्षेपण टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्क करेल

तर मोबाईल आणि लॅपटॉपवर तुम्ही ही मालिका जिओ सिनेमा द्वारे फ्री मध्ये पाहू शकता

याशिवाय डीडी फ्री डिशच्या डीडी स्पोर्ट्स 1.0 चॅनलवर या सामन्यांचं थेट प्रक्षेपण होईल