नव्या चेंडूनं केला टीम इंडियाचा गेम! न्यूझीलंडनं असा पलटवला सामना...
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बंगळुरू येथे खेळला जात आहे
आज (19 ऑक्टोबर) सामन्याचा चौथा दिवस होता. न्यूझीलंडनं पहिल्या डावात 402 धावा केल्या
भारतीय संघ आपल्या पहिल्या डावात केवळ 46 धावांवर ऑलआऊट झाला होता. तर टीम इंडियानं दुसऱ्या डावात 462 धावा केल्या
दुसऱ्या डावात भारतीय संघ 80व्या षटकापर्यंत नियंत्रणात होता. तोपर्यंत भारतानं 3 विकेट गमावून 400 धावा केल्या होत्या
मात्र येथून भारताचा डाव गडगडला आणि टीम इंडियानं पुढील 61 धावात 7 विकेट गमावल्या
वास्तविक, 80व्या षटकानंतर न्यूझीलंडला नवा चेंडू मिळाला, ज्यानंतर किवी गोलंदाजांनी आपली गमावलेली लय पुन्हा प्राप्त केली
विलियम ओरोर्क आणि मॅट हॅन्री यांनी नव्या चेंडूनं 3-3 विकेट घेतल्या, तर टीम साऊदीला एक विकेट मिळाली
दुसऱ्या डावात सरफराज खाननं भारतासाठी 150 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली, तर रिषभ पंत 99 धावा करून बाद झाला