भारत-न्यूझीलंड सामन्यात अंपायरच्या निर्णयामुळे राडा! 

भारताची स्टार क्रिकेटपटू जेमिमाह रॉड्रिगेज हिनं न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातील अंपायरच्या वादग्रस्त रनआऊट निर्णयावर मत व्यक्त केलं

ती म्हणाली की, आम्ही अंपायरच्या निर्णयाचा सन्मान करतो, मात्र हा निर्णय खूप कठोर होता

ही घटना डावाच्या 14व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर घडली, जेव्हा हरमनप्रीतनं अमेलिया केरला धावबाद केलं

यावर अंपायरनं काही वेळ चर्चा केली आणि केर हिला परत बोलावले, ज्यानंतर भारतीय संघ आणि सामनाधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाली

यामुळे सामन बराच वेळ खोळंबला होता. कर्णधार हरमनप्रीत आणि कोच अमोल मुजुमदार यांनी अंपायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली

जेमिमा म्हणाली - जेव्हा अंपायरनं दीप्तीला कॅप दिली, तेव्हा ती तेथे नव्हती. न्यूझीलंडला वाटलं की दुसरी धाव आहे आणि केर दुसऱ्या रनसाठी धावली

ती पुढे म्हणाली - आम्हाला वाटलं की हा रनआऊट आहे. आम्ही पंचांच्या निर्णयाचा सन्मान केला. केर स्वत: मैदानाबाहेर गेली होती  

न्यूझीलंडनं या सामन्यात 58 धावांनी विजय मिळवला. 161 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ केवळ 102 धावाच करू शकला