भारत-पाकिस्तान सामन्यात मोठा राडा! मैदानावरच भिडले दोन्ही संघांचे खेळाडू
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात भारतीय हॉकी संघानं पाकिस्तानचा 2-1 असा पराभव केला
दोन्ही संघ आधीच सेमीफायनलमध्ये पोहचले आहेत. 16 सप्टेंबर रोजी सेमीफायनलमध्ये भारताचा सामना कोरियाशी तर पाकिस्तानचा सामना चीनशी होईल
भारतीय संघाचा या स्पर्धेतील हा सलग पाचवा विजय होता. या सामन्यात मैदानावर मोठा राडा पाहायला मिळाला
चौथ्या क्वार्टरमध्ये पाकिस्तानच्या राणा वहीद अशरफ यानं भारतीय डिफेंडर जुगराज सिंग विरुद्ध खतरनाक टॅकल केलं, ज्यामुळे जुगराज मैदानावर पडला
भारतीय खेळाडू वहीदच्या या कृत्यानं नाखूश दिसले, ज्यानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये भर मैदानात धक्काबुक्की झाली
मैदानावरील अंपायरनं हे प्रकरण व्हिडिओ अंपायरकडे पाठवलं. यानंतर वहीदला यलो कार्ड मिळालं आणि तो 10 मिनिटांसाठी मैदानाबाहेर झाला
जेव्हा सामना संपायला 3 मिनिटं बाकी होती, तेव्हा भारताच्या मनप्रीत सिंगला देखील यलो कार्ड मिळालं. त्याला 5 मिनिटांसाठी निलंबित करण्यात आलं
हॉकीमध्ये जर एखाद्या खेळाडूला ग्रीन कार्ड मिळालं, तर तो 2 मिनिटांसाठी बाहेर होतो. यलो कार्ड मिळालं तर 5 किंवा 10 मिनिटं आणि रेड कार्ड मिळालं तर सामन्यातून बाहेर होतो