टी20 वर्ल्डकप गाजवणारा महाराष्ट्राचा पठ्ठा आता आयपीएलमध्ये खेळणार! 

2024 टी20 वर्ल्डकपमध्ये आपल्या गोलंदाजीनं सर्वांना प्रभावित करणारा भारतीय वंशाचा अमेरिकन क्रिकेटपटू सौरभ नेत्रावळकरनं आयपीएल मेगा लिलावासाठी आपलं नाव नोंदवलं आहे

33 वर्षीय सौरभनं टी20 विश्वचषकाच्या 6 सामन्यात 6 विकेट घेतल्या होत्या. त्यानं पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शानदार कामगिरी केली होती

त्यानं पाकिस्तानविरुद्ध 2 विकेट घेत अमेरिकेला विजय मिळवून दिला होता. या पराभवानंतर पाकिस्तानचा संघ ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला

आयपीएल 2025 साठी मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियात होईल. या लिलावात एकूण 1574 खेळाडूंनी भाग घेतला आहे

मेगा लिलावात 1165 भारतीय आणि 409 विदेशी खेळाडू सहभागी झाले आहेत

या लिलावात सौरभसह अमेरिकेचे 10 खेळाडू उतरले आहेत. यामध्ये एंड्रीस गॉसची बेस प्राईज 40 लाख रुपये असून सौरभ नेत्रावळकरची बेस प्राईज 30 लाख रुपये आहे

सौरभ 2008 अंडर-19 विश्वचषकात विराट कोहलीसोबत खेळला होता. त्यानं 2024 टी20 विश्वचषकात कोहलीची विकेट घेतली होती