आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारे टाॅप-5 गोलंदाज

1) अनिल कुंबळे- फिरकीपटू अनिल कुंबळे भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू आहे. त्याने 403 सामन्यांमध्ये सर्वाधिक 956 विकेट्स घेतल्या आहेत.

2) रविचंद्रन अश्विन- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत फिरकीपटू अश्विन दुसरा खेळाडू आहे. त्याने 281 सामन्यांमध्ये 744 विकेट्स घेतल्या आहेत.

3) हरभजन सिंग- हरभजनने 367 सामन्यांमध्ये 711 विकेट्स त्याच्या नावावर केल्या आहेत. तो भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसरा फिरकीपटू आहे.

4) कपिल देव- कपिल देवने 356 सामन्यांमध्ये भारतासाठी 687 विकेट्स घेतल्या. कपिल देवने भारताला पहिला विश्वचषक देखील जिंकून दिला आहे.

5) झहीर खान- झहीर खानने त्याच्या आतंरराष्ट्रीय कारकीर्दीमध्ये 309 सामने खेळले आणि 610 विकेट्स घेतल्या.