आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं मारणारे टाॅप-5 खेळाडू
1) सचिन तेंडुलकर- महान खेळाडू सचिन तेंडुलकर कसोटीमध्ये सर्वाधिक शतकं ठोकणारा भारतीय खेळाडू आहे. त्यानं 200 कसोटी सामन्यांमध्ये 51 शतकं झळकावली आहेत.
2) जॅक कॅलिस- सर्वाधिक कसोटी शतकांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस दुसऱ्या क्रमांकावर आहे. कॅलिसने 166 कसोटी सामन्यांमध्ये 45 शतकं झळकावली आहेत, तर 13,289 धावा देखील केल्या आहेत.
3) रिकी पाॅन्टिग- ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू पाॅन्टिग या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 168 सामन्यात 41 शतकं झळकावली आहेत. कसोटीमध्ये त्याच्या नावावर 13,378 धावा आहेत.
4) कुमार संगकारा- श्रीलंकेचा दिग्गज कुमार संगकारा या यादीत चौथ्या स्थानावर आहे. त्याने 134 सामन्यात 38 शतकं झळकावली आहेत. संगकारानं कसोटीमध्ये 12,400 धावा केल्या आहेत.
5) राहुल द्रविड- भारताचा माजी दिग्गज खेळाडू राहुल द्रविड सर्वाधिक कसोटी शतक झळकावण्याच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे. त्याने 164 सामन्यात 36 शतकं झळकावली आहेत. द्रविडच्या कसोटीत 13,288 धावा आहेत.