बुमराह नंबर 1 टेस्ट बॉलर, तर अश्विनची घसरण; विराटनंही घेतली मोठी झेप!

भारत-बांगलादेश कसोटी मालिकेनंतर आयसीसीनं ताजी कसोटी रँकिंग जारी केली

मालिकेत 11 विकेट घेणारा जसप्रीत बुमराह जगातील नंबर 1 गोलंदाज बनला आहे. त्यानं आर अश्विनला मागे टाकलं

अश्विन रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर घसरला. टॉप 10 मध्ये जडेजा तिसरा भारतीय आहे, जो सहाव्या स्थानावर आहे

फलंदाजांच्या रँकिंगमध्ये विराट कोहलीनं देखील मोठी झेप घेतली. तो 6 स्थान पुढे सरकून सहाव्या स्थानावर पोहचला आहे

बांगलादेशविरुद्ध शानदार फलंदाजी करणारा यशस्वी जयस्वाल 2 स्थानांची झेप घेऊन तिसऱ्या स्थानावर आलाय

विकेटकीपर फलंदाज रिषभ पंतला 3 स्थानांचं नुकसान झालं. तो 9व्या स्थानावर पोहचलाय

कर्णधार रोहित शर्माचं मोठं नुकसान झालं. तो 5 स्थान घसरून 15व्या स्थानी पोहचला आहे