मायकल वॉनच्या मुलाची धमाल, 11 विकेट घेऊन एकहाती जिंकवला सामना!

मायकल वॉनची गणना इंग्लंडच्या उत्कृष्ट फलंदाजांमध्ये होते. त्यानं इंग्लंडसाठी कसोटीत भरपूर धावा ठोकल्या आहेत

आता मायकल वॉनचा मुलगा आर्ची वॉननं वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून काऊंटी क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली

समरसेटसाठी खेळणाऱ्या आर्चीनं सरे विरुद्धच्या सामन्यात पहिल्या डावात 6 आणि दुसऱ्या डावात 5 विकेट घेतल्या

याशिवाय त्यानं फलंदाजीत 47 धावा केल्या, ज्याच्या बळावर समरसेटनं हा सामना 111 धावांनी जिंकला

आर्ची वॉन केवळ 18 वर्षांचा आहे. तो उजव्या हातानं फिरकी गोलंदाजी आणि फलंदाजी करतो

आर्चीनं आतापर्यंत 2 प्रथम श्रेणी आणि 6 लिस्ट ए सामने खेळले, ज्यात त्यानं 17 विकेटसह 113 धावा केल्या आहेत

मायकल वॉनबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी इंग्लंडसाठी 82 कसोटी आणि 86 एकदिवसीय सामने खेळले

त्यांनी कसोटीमध्ये 18 शतकांसह 5719 धावा केल्या. यामध्ये त्यांची सरासरी 41.44 एवढी राहिली