मोहम्मद शमीचा टीम इंडियात कमबॅक कधी? स्वत: दिलं मोठं अपडेट  

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे बऱ्याच काळापासून संघाबाहेर आहे

शमी शेवटचा गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय विश्वचषकाच्या फायनलमध्ये खेळला होता

आता शमीनं त्याच्या पुनरागमनाबाबत अपडेट दिलं आहे. शमी म्हणाला की, कमबॅक करण्यापूर्वी त्याची 100 टक्के तंदुरुस्त होण्याची इच्छा आहे   

शमी म्हणाला की, तो भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी इच्छुक आहे, मात्र तो कोणताहा धोका पत्कारणार नाही

शमी म्हणाला, मी गोलंदाजी सुरु केलीये, मात्र मी तोपर्यंत कमबॅक करणार नाही, जोपर्यंत मी पूर्णपणे फिट होत नाही. मला भारतासाठी माझं सर्वोत्तम द्यायचं आहे

शमी म्हणतो की त्याला घाई करायची नाही आणि पुन्हा दुखापतग्रस्त व्हायचं नाही. मग ती बांगलादेश, न्यूझीलंड किवा ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका असो

मोहम्मद शमीनं 2023 विश्वचषकाच्या 7 सामन्यात सर्वाधिक 24 बळी घेतले होते. त्यानं भारतासाठी कसोटीत 229, वनडेत 195 आणि टी20 मध्ये 24 बळी घेतले आहेत