टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, दुखापतीनंतर परतला अत्यंत महत्त्वाचा खेळाडू

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा 8 गडी राखून पराभव झाला

या पराभवानंतर भारतीय संघाला एक आनंदाची बातमी मिळाली आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीनंतर मैदानावर परतला

शमीचा मैदानावर सराव करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत खेळू शकला नाही

शमी 2023 विश्वचषकाच्या फायनलपासून संघाबाहेर आहे. त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली

मोहम्मद शमी बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अकादमीत सराव करताना दिसला. त्यानं नेट्समध्ये अभिषेक नायरला गोलंदाजी केली

बंगळुरू कसोटीपूर्वी कर्णधार रोहित शर्मानं शमीच्या फिटनेसवर शंका व्यक्त केली होती. मात्र आता त्याच्या पुनरागमनाच्या शक्यता वाढल्या आहेत

शमी नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावस्कर मालिकेद्वारे टीम इंडियात पुनरागमन करू शकतो