मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी पुन्हा रोहितकडे? गणेश चतुर्थीला दिली हिंट

मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी पुन्हा रोहितकडे? गणेश चतुर्थीला दिली हिंट

आयपीएलमधील सर्वात लोकप्रिय फ्रँचायझी मुंबई इंडियन्सने आपल्या चाहत्यांना गणेशोत्सवाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, या कॅप्शनसह मुंबई इंडियन्सच्या संघाने एक खास फोटो शेअर केला आहे.

AI च्या मदतीने मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचा खास तयार केलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या फोटोत भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरसह सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा पारंपारिक पोषाखात दिसत आहेत.

मुंबई इंडियन्स आगामी आयपीएल लिलावाआधी या खेळाडूंना रिटेन करणार असावी, अशी हिंट यातून मिळते.

या खास फोटोत रोहित सर्वात पुढे बसला असल्याने आगामी लिलावात त्याच्याकडे पुन्हा कॅप्टन्सीची धुरा येण्याचे संकेत आहेत.