हे 4 मोठे विक्रम रविचंद्रन अश्विन कानपूर कसोटीत आपल्या नावे करू शकतो

हे 4 मोठे विक्रम रविचंद्रन अश्विन कानपूर कसोटीत आपल्या नावे करू शकतो

चेन्नईत बांग्लादेशविरुद्ध भारताच्या विजयात रविचंद्रन अश्विनची सर्वात मोठी भूमिका होती. तसेच सामन्यात त्याने अनेक विक्रम आपल्या नावे केला.

आता भारताला बांगलादेशविरुद्धचा दुसरा सामना 27 सप्टेंबरपासून खेळायचा आहे. अशा स्थितीत त्या सामन्यात अश्विनला पुन्हा एकदा काही खास विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे

बांगलादेशविरुद्ध  कानपूरमध्ये अश्विनने चार विकेट घेतले, तर तो डब्ल्यूटीसीच्या सर्कलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत अव्वल स्थानी पोहचेल

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळींच्या यादीत चामिंडा वासला मागे टाकण्याची संधी असणार आहे. ज्यापासून तो 12 विकेट्स मागे आहे

अश्विन कानपूरमध्ये 9 विकेट घेतले तर तो कसोटी क्रिकेटमधील सातवा सर्वात यशस्वी गोलंदाज बनेल. 522 विकेट्ससह अश्विन   आठव्या स्थानावर आहे. ज्यामध्ये नॅथन लियॉन (530 विकेट) 7 व्या स्थानी आहे

कानपूरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात, जर अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत नॅथन लियॉनला मागे टाकले, तर तो या फॉरमॅटमधील सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वात यशस्वी गोलंदाज बनेल