अजंता मेंडिससारखा 'मिस्ट्री स्पिनर', आकडेवारी पाहून बसेल धक्का!
श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात 2 सामन्याच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे
या मालिकेत न्यूझीलंडची कामगिरी अपेक्षेप्रमाणे राहिली नाही. श्रीलंकेनं पहिल्या कसोटीत 63 धावांनी विजय मिळवला
दुसऱ्या सामन्यातही श्रीलंकेनं किवी संघाला फॉलोऑन देऊन 514 धावांची आघाडी घेतली आहे
या सामन्यात श्रीलंकेकडून फिरकीपटू निशान पेयरिसनं पदार्पण केलं, ज्यानं पहिल्या डावात 3 विकेट घेतल्या
निशाननं देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली आहे. त्याच्या चेंडूना ओळखणं फलंदाजांसाठी खूप अवघड जातं
27 वर्षीय निशाननं 41 प्रथम श्रेणी सामन्यात 24.37 च्या उत्कृष्ट सरासरीनं 172 विकेट घेतल्या आहेत
याशिवाय त्यानं 61 लिस्ट ए सामन्यात 86 आणि 39 टी20 सामन्यात 43 विकेट घेतल्या
श्रीलंकेचे चाहते निशानला दुसरा 'अजंता मेंडिस', ज्यानं एकेकाळी जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ माजवली होती
मेंडिसनं श्रीलंकेसाठी 19 कसोटीत 70, 87 वनडेमध्ये 152 आणि 39 टी20 मध्ये 66 विकेट घेतल्या आहेत