क्रिकेटच्या नियमांची खिल्ली, चक्क थर्ड अंपायरशिवाय झाला आंतरराष्ट्रीय सामना!

ऑस्ट्रेलियानं स्कॉटलँडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे

मात्र या मालिकेत क्रिकेटच्या नियमांचं सर्रास उल्लंघन होतंय. वास्तविक, या मालिकेत थर्ड अंपायरच नाही

कसोटी क्रिकेटचा दर्जा असलेल्या देशाच्या मालिकेत थर्ड अंपायरच नसल्यानं क्रिकेट चाहते निराश आहेत

थर्ड अंपायरची अनुपस्थिती दुसऱ्या टी20 मध्ये जाणवली, जेव्हा जेक फ्रेझर-मॅकगर्कच्या संभाव्य स्टंपिंगकडे कोणी लक्ष दिलं नाही

ब्रँडन मॅकमुलेनच्या चेंडूवर विकेटकीपर चार्ली टियरनं स्टंपिंग केलं, मात्र थर्ड अंपायरच नसल्यामुळे रिव्ह्यूच्या अपीलला फेटाळण्यात आलं

मॅकगर्क मात्र याचा फायदा उचलू शकला नाही. तो 16 धावा करून बाद झाला