भारतीय महिला करणार पाकिस्तानी क्रिकेटपटूशी लग्न, इस्लाम धर्माचाही करणार स्वीकार
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू रजा हसन एका भारतीय महिलेशी लग्न करणार आहे
32 वर्षीय रजानं भारताच्या पूजा बोमनशी साखरपुडा केला, ज्याचे फोटो त्यानं आपल्या सोशल मीडियावर शेअर केले
पूजा न्यूयॉर्केमध्ये राहते, जेथे दोघांचा साखरपुडा झाला. दोघे पुढच्या वर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये लग्न करणार आहेत
रजा हसननं मीडियाला सांगितलं की, पूजा हिंदू धर्मावर विश्वास ठेवते, मात्र तिला इस्लामबद्दल कुतुहल आहे. ती माझ्यासाठी आपला धर्म बदलणार आहे
रजा हसननं ऑक्टोबर 2014 मध्ये पाकिस्तानसाठी पदार्पण केलं होतं. हा त्याच्या करिअरचा पहिला आणि शेवटचा सामना राहिला
या डाव्या हाताच्या फिरकीपटूनं पाकिस्तानसाठी 10 टी20 सामने खेळले, ज्यात त्यानं 10 बळी घेतले आहेत