आर अश्विनची ऐतिहासिक कामगिरी, कसोटी क्रिकेटमधील अनेक रेकॉर्ड मोडले!

भारतीय संघानं बांगलादेशविरुद्धच्या चेन्नई कसोटीत 280 धावांनी शानदार विजय मिळवला

टीम इंडियाच्या या विजयात रविचंद्रन अश्विनची भूमिका महत्त्वाची राहिली, ज्यानं सामन्यात अष्टपैलू कामगिरी केली 

38 वर्षीय अश्विननं पहिल्या डावात 113 धावा केल्या. तर बांगलादेशच्या दुसऱ्या डावात 6 बळी घेतले

यासह अश्विन कोणत्याही कसोटीत शतक आणि 5 विकेट हॉल घेणारा सर्वात वयस्कर खेळाडू बनला आहे. त्यानं भारताच्या पॉली उमरीगर यांचा 62 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला

उमरीगर यांनी 1962 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद 172 धावा आणि 5 विकेट घेतल्या होत्या

अश्विन भारतासाठी 5 विकेट हॉल घेणारा सर्वात वयस्कर खेळाडू बनला आहे. त्यानं विनू माकंड यांचा रेकॉर्ड मोडला, ज्यांनी 1955 मध्ये वयाच्या 37व्या वर्षी ही कामगिरी केली

अश्विननं एका कसोटीत शतक आणि 5 विकेट हॉल घेण्याची कामगिरी चौथ्यांदा केली. एकाच मैदानावर दोनवेळा असं करणारा तो पहिलाच खेळाडू बनला आहे

कसोटीच्या चौथ्या डावात अश्विननं 7व्यांदा 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेतल्या. या बाबतीत तो रंगना हेराथ (12) नंतर शेन वॉर्न आणि मुरलीधरन सोबत दुसऱ्या स्थानावर आहे

अश्विननं कसोटीत 37व्यांदा एका डावात 5 किंवा अधिक विकेट घेतल्या. याबाबतीत त्यानं शेन वॉर्नची बरोबरी केली. मुथय्या मुरलीधरन (67) पहिल्या स्थानावर आहे