राशिद खानची वाढदिवशी मोठी कामगिरी! वनडे क्रिकेटमध्ये असं प्रथमच घडलं
20 सप्टेंबर रोजी शारजाह क्रिकेट स्टेडियवर झालेल्या सामन्यात अफगाणिस्ताननं दक्षिण आफ्रिकेचा 177 धावांनी पराभव केला
हा वनडे क्रिकेटमध्ये धावांच्या बाबतीत अफगाणिस्तानचा सर्वात मोठा विजय आहे
अफगाणिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना 311/4 धावा केल्या. रहमानुल्लाह गुरबाज (105) रहमत शाह (50) आणि अजमतुल्लाह उमरजाई (86) यांनी शानदार फलंदाजी केली
अफगाणिस्तानसाठी 'बर्थडे बॉय' राशिद खाननं 5 बळी घेतले, तर 20 वर्षाच्या नांगेयालिया खारोटेनं 4 विकेट घेतल्या
या दोघांच्या गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेची टीम 34.2 षटकांत 134 धावांवर ऑलआऊट झाली
20 सप्टेंबर रोजी 26 वर्षांचा झालेल्या राशिद खाननं वनडे क्रिकेटमध्ये एक अनोखा रेकॉर्ड केला. तो जन्मदिनी 5 विकेट घेणारा पहिला गोलंदाज बनला आहे
वनडेमध्ये वाढदिवशी सर्वोत्तम गोलंदाजी 5/19 - राशिद खान, 20 सप्टेंबर 2024 4/12 - वर्नोन फिलँडर, 2007 4/44 - स्टुअर्ट ब्रॉड, 2010