6 विकेट घेताच जडेजाच्या नावे होणार अनोखा रेकॉर्ड, केवळ 2 भारतीयांनी केली ही कामगिरी
चेन्नईत 19 सप्टेंबरपासून भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरुवात होईल
या कसोटीत अष्टपैलू रवींद्र जडेजाचं खेळणं जवळपास निश्चित आहे, जो या सामन्यात एक अनोखा रेकॉर्ड करू शकतो
जडेजा कसोटी क्रिकेटमध्ये 300 बळी आणि 3000 धावा करणारा तिसरा भारतीय बनू शकतो
यापूर्वी ही कामगिरी फक्त कपिल देव आणि रविचंद्रन अश्विन यांनी केली आहे
रवींद्र जडेजानं आतापर्यंत खेळलेल्या 72 कसोटी सामन्यांत 294 विकेट घेतल्या. त्याचबरोबर त्यानं फलंदाजीत 3036 धावा केल्या आहेत
38 वर्षीय अश्विननं 100 कसोटीमध्ये 516 विकेट घेतल्या. याशिवाय त्याच्या नावे 3309 धावा आहेत
दिग्गज अष्टपैलू कपिल देव यांनी भारतासाठी 131 कसोटींमध्ये 434 विकेट आणि 5248 धावा केल्या