रिषभ पंतसाठी एमएस धोनीला मागे टाकणे सोपे नाही, या बाबतीत माही टाॅपवरच..

रिषभ पंतसाठी एमएस धोनीला मागे टाकणे सोपे नाही, या बाबतीत माही टाॅपवरच..

एमएस धोनी हा क्रिकेट जगतातील सर्वात यशस्वी कर्णधार तर आहेच, पण तो यष्टिरक्षणातील महान कर्णधारांपैकी एक आहे. धोनीने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2019 मध्ये खेळला.

आता पुढचा धोनी म्हणून रिषभ पंतकडे पाहिले जात असून, त्याने कसोटीमध्ये शतकांच्या बाबतीत धोनीची बरोबरी केली आहे. धोनीचे यष्टिरक्षक म्हणून विक्रम आहेत जे मोडणे पंतसाठी सोपे नाही.

धोनीने जवळपास 15 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 538 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 17,266 धावा केल्या.

धोनीने वनडे क्रिकेटमध्ये 10,773 धावा केल्या आहेत. तर कसोटी आणि टी-20 क्रिकेटमध्ये त्याच्या अनुक्रमे 4,876 आणि 1,617 धावा आहेत.

दुसरीकडे, रिषभ पंतच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला 2017 मध्ये सुरुवात झाली. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 2,419 धावा केल्या आहेत.

दुसरीकडे, त्याने एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये 871 आणि 1,209 धावा केल्या आहेत. म्हणजेच पंतने आत्तापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 4,499 धावा केल्या आहेत.

पंत केवळ 26 वर्षांचा असला तरी तो ज्या वेगाने धावा करतोय तो प्रभावी आहे. त्यानुसार, पंत धावांच्या बाबतीत धोनीला मागे सोडू शकेल याची शक्यता फार कमी आहे.

एमएस धोनी हा यष्टीरक्षक आहे ज्याने जगातील सर्वाधिक फलंदाजांना यष्टिचीत केले आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत एकूण 195 वेळा यष्टिचीत केले.

ऋषभ पंतकडे पाहिले तर तो आतापर्यंत केवळ 26 फलंदाजांना स्टंप आऊट करू शकला आहे.