रोहित शर्माच्या कर्णधार पदाखाली भारतीय कसोटी  संघाची कामगिरी

रोहित शर्माच्या कर्णधार पदाखाली भारतीय कसोटी  संघाची कामगिरी

हिटमॅनने 2021 मध्ये भारतीय कसोटी संघाची जबाबदारी स्वीकारली. बीसीसीआयने विराट कोहलीकडून कर्णधारपद काढून तिन्ही फॉरमॅटची जबाबदारी त्याच्याकडे सोपवली

रोहित शर्मा नेतृत्वाखाली भारतीय संघाने घरच्या मैदानावर पहिली कसोटी मालिका श्रीलंकेविरुद्ध खेळली. ज्यामध्ये भारताने 2-0 असा विजय मिळवला

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आतापर्यंत 16 कसोटी सामने खेळले. यापैकी संघाने 10 जिंकले आहेत तर 4 हरले आहे तर 2 अनिर्णित राहिले आहेत

रोहित शर्माचे नेतृत्वाखाली टीम इंडियाची घराबाहेर देखील शानदार कामगिरी आहे. संघाने आतापर्यंत परदेशात पाच सामने खेळले. यापैकी 2 सामने जिंकले 2 सामने हरल्या तर 1 सामना अनिर्णीत राहिला आहे

रोहित शर्माची खरी कसोटी ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मध्ये असेल. असे मानले जात आहे.  भारतीय संघ वर्षाखेरीस पाच कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलिया दौरा करणार आहे

एक खेळाडू म्हणून रोहित शर्माने आतापर्यंत 59 कसोटी सामने खेळल्या आहेत. ज्याच्या 101 डावात 4137 धावा केल्या आहेत