गंभीर-रोहितमध्ये कॉमनसेन्स नाही, माजी खेळाडूचं धक्कादायक वक्तव्य
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यात खेळला जात आहे
न्यूझीलंडनं मालिकेतील पहिला सामना जिंकत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि कोच गौतम गंभीर यांनी खेळपट्टी वाचण्यात चुकी केली
यावर आता भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी यानं मोठं वक्तव्य केलं. तो म्हणाला की, रोहित आणि गंभीरमध्ये कॉमनसेन्सची कमतरता आहे
मनोज तिवारी म्हणाला, मला अनेक वेळा त्यांचे निर्णय समजत नाहीत. कर्णधार आणि कोच काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे, हे मला कळत नाही
मनोज तिवारी म्हणाला, मला वाटतं की, कोणताही नवा कर्णधार किंवा कोच आला तर तो काही ना काही सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो आणि असे निर्णय घेतो
तो म्हणाला, मला माहित होतं की टीम एका स्पिनरचा वापर कमी करेल. मात्र मला माहित नव्हतं की, तो अश्विन असेल
मनोज म्हणाला, कर्णधाराच्या डोक्यात भरपूर काही चालू असतं. अशा परिस्थितीत कोचनं त्याला टिप्स देणं गरजेचं असतं. मात्र मला माहित नाही दोघांमध्ये काय झालं