सूर्यकुमार यादवचं कसोटी पुनरागमन कठीण! या कारणामुळे वाढल्या अडचणी
भारताच्या टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव बुची बाबू स्पर्धेदरम्यान दुखापतग्रस्त झाला आहे
बुची बाबू स्पर्धेदरम्यान मुंबईकडून खेळताना तमिळनाडू इलेव्हनविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना सूर्याला दुखापत झाली
सूर्याच्या हाताला दुखापत झाली असून ही जखम किती गंभीर आहे, याबाबत कळाले नाही
या दुखापतीमुळे 5 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफीत सूर्याच्या खेळण्याच्या शक्यता कमी आहेत
सूर्याने अलीकडेच पुन्हा कसोटी क्रिकेटमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती
19 सप्टेंबरापासून सुरू होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत सूर्यकुमारला पुनरागमनाची संधी मिळेल? का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे