षटकारांचा पाऊस पाडत टीम इंडियानं केला वर्ल्ड रेकॉर्ड, कसोटीत असं कधीच घडलं नाही!
भारत-बांगलादेश यांच्यातल्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे
बांगलादेशनं पहिल्या डावात 233 धावा केल्या, ज्याच्या प्रत्युत्तरात टीम इंडियानं 285 धावा करून डाव घोषित केला
या सामन्यात भारतीय संघानं तुफानी फलंदाजी करत अनेक रेकॉर्ड बनवले. यामध्ये षटकारांच्या रेकॉर्डचाही समावेश आहे
भारत कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार (96) ठोकणारा संघ बनला आहे
यापूर्वी हा विक्रम इंग्लंडच्या नावे होता, ज्यांनी 2022 मध्ये 29 डावात 89 षटकार ठोकले होते
भारतीय संघानं 2024 मध्ये फक्त 14 डावात 96 षटकार लगावले आहेत
टीम इंडियाला या वर्षात आणखी 7 कसोटी सामने खेळायचे आहेत. अशाप्रकारे भारताकडे 150 षटकारांचा आकडा गाठण्याची संधी आहे
भारतीय संघानं 2021 मध्ये एका वर्षात 87 षटकारांचा विक्रम केला होता