टीम इंडिया या गोलंदाजापासून सावध राहा! बाबर-रिझवानसारखे फलंदाजही फेल
बांगलादेशनं नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत पाकिस्तानचा 2-0 असा पराभव केला
आता 19 सप्टेंबरपासून बांगलादेशचा संघ 2 कसोटी आणि 3 टी20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे
या मालिकेत बांगलादेशचा वेगवान गोलंदाज नाहिद राणावर सर्वांच्या नजरा असतील, ज्यानं पाकिस्तानविरुद्ध शानदार कामगिरी केली होती
6 फूट 2 इंच उंचीच्या नाहिदनं पाकिस्तानविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात 4 बळी घेतले होते
त्यानं बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान सारख्या पाकिस्तानच्या स्टार फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता
खास बाब म्हणजे, 21 वर्षीय नाहिदनं सामन्याच्या चौथ्या दिवशी ताशी 152 किमी पेक्षा जास्त वेगानं गोलंदाजी केली होती
तो ताशी 150 किमीचा आकडा गाठणार बांगलादेशचा पहिला गोलंदाज आहे. यापूर्वी रुबेल हुसैननं ताशी 149.5 किमी वेगानं गोलंदाजी केली होती
नाहिद राणा त्याचा तुफान वेग आणि उसळत्या चेंडूंनी भारतीय फलंदाजाना त्रस्त करू शकतो
नाहिद प्रथमच भारताविरुद्ध खेळणार आहे. त्यानं या वर्षी मार्चमध्ये श्रीलंकेविरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं
उजव्या हाताच्या या वेगवान गोलंदाजानं आतापर्यंत खेळलेल्या 3 कसोटी सामन्यांमध्ये 11 विकेट घेतल्या आहेत