टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांची कसोटी कारकीर्द

दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मोर्ने मॉर्केल भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त झाला आहे

आपल्या काळात मॉर्केल जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक मानला जायचा. आज आम्ही तुम्हाला त्याचा कसोटी कारकीर्दीबद्दल माहिती देतो

39 वर्षीय मॉर्केलनं 2006 मध्ये भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. त्यानं दक्षिण आफ्रिकेसाठी 86 कसोटी सामने खेळले

मॉर्केलनं कसोटीच्या 160 डावात एकूण 309 विकेट घेतल्या

कसोटीत त्याचा इकॉनॉमी रेट 3.11 आणि सरासरी 27.67 एवढी राहिली

6 फुट 4 इंच उंचीच्या या वेगवान गोलंदाजानं आपल्या कारकीर्दीत एकूण 8 वेळा एका डावात 5 विकेट घेतल्या

फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर, मॉर्केलनं 104 डावात 11.65 च्या सरासरीनं 944 धावा केल्या

मोर्ने मॉर्केलनं 30 मार्च 2018 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला शेवटचा कसोटी सामना खेळला

मॉर्केलनं कसोटीशिवाय 117 एकदिवसीय. 44 टी20 आणि 70 आयपीएल सामने खेळले आहेत