कारकिर्दीतील शेवटच्या कसोटीत शून्यावर बाद होणारे दिग्गज; भारताच्या 'या' खेळाडूंचा समावेश

वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा कारकिर्दीतील शेवटच्या कसोटी सामन्यात शून्यावर बाद झाला. ब्रायन लारा 2006 मध्ये पाकिस्तानविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.

भारताचा माजी फलंदाज मुरली विजय कारकिर्दीतील शेवटच्या कसोटी सामन्यात शून्यावर बाद झाला. मुरली विजयनं 2018 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.

वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज शिवनारायण चंद्रपॉल कारकिर्दीतील शेवटच्या कसोटी सामन्यात शून्यावर बाद झाला. शिवनारायण चंद्रपॉलनं 2015 मध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.

दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हाशिम आमला कारकिर्दीतील शेवटच्या कसोटी सामन्यात शून्यावर बाद झाला. हाशिम आमला 2019 मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.

ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू सायमंड्स कारकिर्दीतील शेवटच्या कसोटी सामन्यात शून्यावर बाद झाला. अँड्र्यू सायमंड्सनं 2008 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन कारकिर्दीतील शेवटच्या कसोटी सामन्यात शून्यावर बाद झाला. मायकेल वॉननं 2008 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.

भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना कारकिर्दीतील शेवटच्या कसोटी सामन्यात शून्यावर बाद झाला. सुरेश रैनानं शेवटचा कसोटी सामना 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक कारकिर्दीतील शेवटच्या कसोटी सामन्यात शून्यावर बाद झाला. शोएब मलिकनं शेवटचा कसोटी सामना 2015 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता.

 कारकिर्दीतील शेवटच्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज मार्लन सॅम्युअल्स शून्यावर बाद झाला. मार्लन सॅम्युअल्सनं शेवटचा कसोटी सामना 2016 मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळला होता.