'हे' क्रिकेटपटू आहेत दारुचे शौकीन; एकाने तर दारूच्या नशेत शतकही ठोकलंय!

'हे' क्रिकेटपटू आहेत दारुचे शौकीन; एकाने तर दारूच्या नशेत शतकही ठोकलंय!

क्रिकेट हा जंटलमन लोकांचा खेळ म्हणून ओळखला जातो. मात्र काही क्रिकेटपटूंना दारूचे व्यसन लागले.

एका क्रिकेटपटूने तर दारूच्या नशेतच शतकी खेळी केली होती.

दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हर्शल गिब्सने 2006 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 175 धावांची खेळी केली होती. या सामन्यापूर्वी त्यांनी रात्री खूप दारू प्यायली होती. दुसऱ्या दिवशीही ते या दारूच्या नशेत होते.

सचिन तेंडुलकरचा मित्र आणि सहकारी विनोद कांबळी यालाही दारूची वाईट सवय लागली होती. कांबळीने अनेकवेळा आपल्याला दारूचे व्यसन असल्याचे कबूल केले आहे.

दिवंगत ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्स हे त्यांच्या काळातील उत्कृष्ट अष्टपैलू होते. मात्र त्यांना दारूचे वाईट व्यसन लागले होते. त्यांनी स्वत: याबाबत खुलासा केला होता.