हॅट्रिक घेतल्यामुळे गोलंदाजाच्या नावावर विक्रमाची नोंद होते. परंतु, सलग तीन चेंडूत तीन विकेट्स घेणे सोपे नसते.

पण चक्क विश्वचषकात हॅट्रिक घेण्याचा पराक्रम दोन भारतीय गोलंदाजांनी करून दाखवला आहे.

1. चेतन शर्मा- त्यांनी 1987च्या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध हॅट्रिक घेतली होती.

त्यांनी केन रुदरफोर्ड, इयान स्मिथ आणि इवेन चॅटफिल्ड यांना बाद केलेले.

2. मोहम्मद शमी- शमीने 2019च्या विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध हॅट्रिक घेत इतिहास रचला होता.

त्याने मोहम्मद नबी, आफताब आलम आणि मुजीब उर रहमान यांची विकेट घेत हॅट्रिक पूर्ण केली होती.