आंतरराष्ट्रीय टी 20 सामन्याच्या पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करणारे टाॅप-5 फलंदाज

स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात ड्रेव्हिस हेडने 25 चेंडूत 80 धावांची खेळी केली. पॉवरप्लेमध्ये त्याने 73 धावा केल्या. टी20 सामन्याच्या पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज बनला आहे

ट्रॅव्हिस हेडच्या आधी पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंगच्या नावावर होता. त्याने 2020 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात 67 धावा केल्या होत्या

या यादीत न्यूझीलंडचा कॉलिन मुनरो तिसऱ्या स्थानावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या मुनरोने 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पॉवरप्लेमध्ये 66 धावा केल्या होत्या

तर या यादीत दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा सलामी फलंदाज क्विंटन डी कॉक चाैथ्या क्रमांकावर आहे. त्याने 2023 मध्ये वेस्ट इंडिडविरुद्ध पॉवरप्लेमध्ये 24 चेंडूत 64 धावा केल्या होत्या

वेस्ट इंडिजच्या एविन लुईसचे नावही टॉप-5 मध्ये सामील आहे. त्याने 2018 मध्ये बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात त्याने 36 चेंडूत 89 धावा केल्या होत्या. त्या सामन्याच्या पॉवरप्लेमध्ये लुईसने 24 चेंडूत 62 धावा केल्या होत्या