बांगलादेशचे हे फॉर्मात असलेले खेळाडू वाढवतील भारताची डोकेदुखी

बांगलादेशचे हे फॉर्मात असलेले खेळाडू वाढवतील भारताची डोकेदुखी

बांगलादेश संघाने पाकिस्तानविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करत 2-0 असा विजय मिळवला.

या मालिकेत बांगलादेशकडून अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. आता हे खेळाडू भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतात.

बांगलादेशला भारताविरुद्ध 19 सप्टेंबरपासून कसोटी मालिका खेळायची आहे.

बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू मेहदी हसनवर सर्वांच्या नजरा असतील. हसनने पाकिस्तानमध्ये बॉल आणि बॅटने प्रभावी प्रदर्शन केले आणि तो मालिकावीर ठरला.

Caption

महमूद हसन भारतात आपली प्रतिभा दाखवू शकतो. पाकिस्तानविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांत त्याने 10 विकेट्स घेतले आहेत.

Caption

बांगलादेशचा यष्टीरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीम भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतो.

पाकिस्तानविरुद्धचा शतकवीर लिटन दास भारतीय गोलंदाजांना धोबीपछाड देऊ शकतो.