दातानं चावा घेणारा खेळाडू निवृत्त, मेस्सी-नेमारशी आहे खास नातं!
उरुग्वेचा दिग्गज स्ट्रायकर लुईस सुआरेझनं आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली
तो उरुग्वेसाठी शेवटचा 2024 कोपा अमेरिका स्पर्धेत खेळला होता
सुआरेझ 2014 फिफा विश्वचषकात इटलीच्या जॉर्जिओ चिलीनीला दातानं चावल्यानंतर खूप चर्चेत आला होता
इटलीचा डिफेंडर चिलीनीनं सुआरेझवर मॅचदरम्यान खांद्याला चावा घेतल्याचा आरोप केला होता
सुआरेझवर 2010 आणि 2013 मध्येही अशाच प्रकारचे आरोप करण्यात आले होते
यानंतर सुआरेझची फुटबॉलमध्ये 'चावा घेणारा खेळाडू' म्हणून ओळख निर्माण झाली
लुईस सुआरेझनं 4 फिफा विश्वचषक आणि 5 कोपा अमेरिका स्पर्धेत उरुग्वेचं प्रतिनिधित्व केलंय
तो उरुग्वेसाठी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक (69) गोल करणारा खेळाडू आहे
सुआरेझ 2014 ते 2017 दरम्यान नेमार आणि 2020 पर्यंत लिओनेल मेस्सीसोबत बार्सिलोनासाठी खेळला होता