कानपूर कसोटीत पुन्हा आठवला 'गुटखामॅन', 3 वर्षांपूर्वी झाला होता व्हायरल

भारत-बांगलादेश यांच्यातल्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे

या सामन्यात भारतीय संघानं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो आतापर्यंत योग्य ठरला आहे

वेगवान गोलंदाज आकाश दीपनं बांगलादेशला सुरुवातीलाच 2 झटके दिले

या सामन्यादरम्यान चाहत्यांना त्या व्यक्तीची आठवण येत आहे, जो 2021 मध्ये आपल्या गुटखा खाण्याच्या स्टाईलनं चर्चेत आला होता

2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटीदरम्यान एका चाहत्याला गुटखा खाताना कॅमेऱ्यात कैद करण्यात आलं, जे इंटरनेटवर खूप व्हायरल झालं होतं

'गुटखा मॅन' म्हणून व्हायरल झालेल्या या व्यक्तीचं खरं नाव शोभित पांडे आहे, ज्यानं सामन्यानंतर सांगितलं की तो गुटखा नाही तर गोडी सुपारी खात होता

2021 मधील हा भारत-न्यूझीलंड सामना ड्रॉ झाला, मात्र या सामन्याला गुटखा मॅननं संस्मरणीय बनवलं