कोण आहे हा 4 फुट उंचीचा पॅरा ॲथलीट, ज्यानं देशासाठी सुवर्णपदक जिंकलं?
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या नवदीप सिंहनं भालाफेकीत सुवर्णपदक जिंकलं. त्यानं फायनलमध्ये 47.32 मीटर थ्रो केला
नवदीप दुसऱ्या स्थानी राहिला होता. मात्र पहिल्या स्थानावरील इराणचा खेळाडू अपात्र ठरला, ज्यामुळे नवदीपला सुवर्णपदक मिळालं
भालाफेकीच्या F41 श्रेणीत नवदीपसारख्या अशा ॲथलीट्सचा समावेश असतो, जे उंचीनं छोटे असतात
हरियाणाच्या पानीपत मध्ये जन्मलेल्या नवदीपला बालपणापासूनच संघर्ष करावा लागला. त्याचा जन्म सातव्या महिन्यातच झाला होता.
यामुळे नवदीपच्या शरिराची पूर्ण वाढ झाली नाही. मात्र त्याच्या आई-वडिलांनी त्याला कधीच याची जाणीव होऊ दिली नाही
नवदीपचे वडील पैलवान होते, ज्यांनी त्याला मार्गदर्शन केलं. 2017 मध्ये नवदीपनं युवा आशियाई पॅरा गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकलं
23 वर्षीय नवदीपनं राष्ट्रीय स्तरावर 5 मेडल जिंकले आहेत. त्यानं यावर्षी पॅरा वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये कांस्य पदक जिंकलं होतं
4 फूट 4 इंच उंचीचा नवदीप इनकम टॅक्स विभागात निरीक्षकाच्या पदावर आहे. त्याला 2012 मध्ये राष्ट्रीय बाल पुरस्कारही मिळाला होता