विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला का आला? कर्णधारानं सांगितलं कारण

भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे

सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघ अवघ्या 46 धावांत ऑलआऊट झाला. कसोटीमध्ये हा भारताचा तिसरा सर्वात कमी स्कोर आहे

भारताच्या डावात विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला, ज्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे

कोहली 8 वर्षांनंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. मात्र तो भोपळाही न फोडता तंबूत परतला

आता कोहलीच्या बॅटिंग पोझिशनवर कर्णधार रोहित शर्मानं खुलासा केला आहे. तो म्हणाला की, विराट तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी तयार होता

रोहित म्हणाला, केएल राहुलला बऱ्याच काळानंतर 6व्या क्रमांकावर संधी मिळाली. अनुभवी खेळाडूंना अधिक जबाबदारी मिळायला हवी. म्हणून यावेळी विराट तिसऱ्या क्रमांकावर आला

रोहित पुढे म्हणाला, आम्हाला सरफराजला त्याच्या नेहमीच्या क्रमांकावर खेळवायचं होतं. आम्हाला रिषभ आणि राहुलचं स्थान देखील बदलायचं नव्हतं

कसोटीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहलीची आकडेवारी फारशी खास नाही. त्यानं 7 डावात केवळ 41 धावा केल्या आहेत