'मी धोनीला माफ करणार नाही, मुलगा युवराजला भारतरत्न..', योगराज सिंह यांचे वक्तव्य

भारतीय संघाचा सिक्सर किंग युवराज सिंगचे वडील " योगराज सध्या चर्चेत आहेत

योगराज सिंगने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीवर नाराजी व्यक्त केली तसेच युवीला भारतरल्न देण्याची मागणी केली

तुम्ही धोनीला कधी माफ करू शकाल का? याला प्रत्युत्तर म्हणून योगराज एका मुलाखतीत महणाले - नाही. कधीच नाही.!

योगराज म्हणाले, 'हा तो (धोनी) महान आहे. मी त्याचा आदर करतो. पण त्याने माइया मुलाविरुद्ध जे केले त्यासाठी माफी देता येत नाही'

पुढे म्हणाले, 'त्या माणसाने माइया मुलाचे जीवन संपवले. युवी अजून 4-5 वर्षे क्रिकेट खेळू शकला असता. मी, गंभीर, सेहवाग म्हणत नाही तर जग असे महणते'

असा खेळाडू आजवर झाला नाही आणि होणार नाही. कॅन्सरशी लढा देऊन या देशासाठी खेळणाऱ्या युवराजला भारतरल्न मिळायला हवा, असं मला वाटतं

2011 च्या विश्वचषकादरम्यान युवीला कर्करोग झाला होता हे त्याला नंतर कळले, पण कॅन्सरशी लढत असताना युवीने फायनल खेळून देशाला चॅम्पियन बनवले

2011 च्या एकदिवसीय विश्वचषकात युवराजला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. 15 विकेट घेण्यासोबतच त्याने स्पर्धेत 362 धावाही केल्या