fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर! जूलैमध्ये होऊ शकते ही कसोटी मालिका

West Indies are planning to fly to England around June 8 for a 3-match Test series

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे मार्चपासून ठप्प झालेले क्रीडाजगत हळुहळु पुन्हा सुरु करण्याच्या दिनेशे पाऊले उचलण्यास सुरुवात झाली आहे. नुकतेच वेस्ट इंडिज क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉनी ग्रेव्ह यांनी सांगितले आहे की ते ३ कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडला त्यांचा २५ जणांचा संघ ८ जूनच्या आसपास पाठवण्याची योजना आखत आहेत.

ग्रेव्ह यांनी असेही सांगितले की इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डासह मागील ६ आठवड्यांपासून चर्चा सुरु आहे. तसेच येत्या काही दिवसांत क्रिकेट वेस्ट इंडीजला या दौऱ्याला जाण्यासाठी औपचारिक ऑफरची अपेक्षा आहे.

ग्रेव्ह यांनी इसपीएन क्रिकइन्फोला एका मुलाखतीत सांगितले खेळाडू इंग्लंडला जाण्याआधी तीन ते चार दिवस आधी कोरोना व्हायरची चाचणी करतील. तसेच त्यांना एकत्र अँटिग्वाला बोलावण्यात येईल आणि तिथूनच ते त्याचदिवशी एका विमानाने निघतील. तसेच ते क्वारंटाईनही होतील.

तसेच त्यांनी असेही सांगितले की सध्याच्या योजनेनुसार कसोटी सामने अनुक्रमे ८, १६ आणि २४ जूलैला सुरु होतील. याआधी हा दौरा ४ जूनला सुरु होणार होता. मात्र इंग्लंडमध्ये कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर १ जूलैपर्यंत कोणताही व्यावसायिक सामना होऊ शकत नसल्याने हा दौरा पुढे ढकलण्यात आला.

याबरोबरच ग्रेव्ह यांनी असेही स्पष्ट केले की सात आठवडे कुटुंबाला सोडून ब्रिटनला जाणे आणि जैव-सुरक्षित ठिकाणी खेळायचे याबद्दल खेळाडू व सहाय्यक कर्मचार्‍यांमध्ये अजूनही काही शंका आहे. पण अजूनतरी कोणत्याच खेळाडूने कोणत्याही दौर्‍यावर जाण्याची इच्छा नसल्याचे औपचारिकपणे सांगितले नाही.

पण असे असले तरी जर हा दौरा जूलैमध्ये झाला तर ऑस्ट्रेलियाच्या इंग्लंड दौऱ्यावर प्रश्नचिन्ह असेल. कारण ऑस्ट्रेलिया ३ टी२० आणि ३ वनडे सामने खेळण्यासाठी जूलैमध्ये इंग्लंड दौऱ्यावर येणार होते. मात्र सध्यातरी सर्वच मालिकांवर कोरोना व्हायरसची टांगती तलवार आहे.

ट्रेंडिंग घडामोडी – 

पब्जी खेळणाऱ्यांसाठी खुशखबर! घरबसल्या जिंकू शकतात १ कोटी रुपये

भारताचे ‘हे’ ३ अभागी खेळाडू ज्यांना अचानकच संघातून दाखवला बाहेरचा रस्ता

धोनीची एक चूक नडली आणि मुंबई झाली होती आयपीएल चॅंम्पियन

You might also like