इंग्लंड क्रिकेट संघ पुढील महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड संघात 3 वनडे आणि 5 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले जाणार आहेत. या दौऱ्याला 3 डिसेंबरपासून वनडे मालिकेने सुरुवात होणार आहे. मात्र, या मालिकेपूर्वी वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू ड्वेन ब्रावो नाराज झाला आहे. चला तर, ब्रावो कशामुळे नाराज झाला आहे, जाणून घेऊयात…
ब्रावो कशामुळे नाराज?
खरं तर, वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने (West Indies) आगामी मालिकेसाठी ड्वेन ब्रावो (Dwayne Bravo) याचा भाऊ डॅरेन ब्रावो (Darren Bravo) याच्या नावाचा विचार केला नाही. एवढंच नाही, तर त्याला ताफ्यातही सामील केले नाहीये. अशात ब्रावोने सोशल मीडियावर आश्चर्य व्यक्त करत आपला राग व्यक्त केला आहे.
ब्रावोने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत लिहिले की, “ही बीएस (बकवास) कधी थांबेल? मी माझा भाऊ (डॅरेन ब्रावो) याची निवड न झाल्याने हैराण नाहीये, पण अलीकडील बदलांनंतर मला संघात थोडी सुधारणा अपेक्षित होती. हे बिल्कुल स्वीकारण्याच्या लायकीचे नाहीये. मला याचा अर्थ समजत नाहीये. माझे काही प्रश्न आहेत. मला आधी कुणीतरी सांगा, वेस्ट इंडिज क्रिकेट संघ निवडण्यामागील मापदंड काय आहेत? जाहीर आहे की, हे फक्त प्रदर्शनाच्या आधारे होऊ शकत नाही.”
View this post on Instagram
वेस्ट इंडिजमध्ये बदलाचे वारे
वेस्ट इंडिज क्रिकेट (West Indies Cricket) संघ सध्या काही कठोर पावले उचलत आहे. खरं तर, विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेसाठी क्वालिफाय न झाल्यामुळे कॅरिबियन संघावर जोरदार टीका झाली होती. अशात विश्वचषक 2027 लक्षात घेता बोर्डाने आतापासूनच खेळाडूंचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे.
इंग्लंडविरुद्धच्या मायदेशातील वनडे मालिकेसाठी संघात मोठे बदल झाले आहेत. या दरम्यान संघाचा निवडकर्ता आणि माजी सलामी फलंदाज डेसमंड हेन्स म्हणाले की, “कॅरिबियन संघ पुढील विश्वचषकात जागा बनवण्यासाठी पुनर्निर्माणावर आपले लक्ष केंद्रित करत आहे. आगामी मालिकेसाठी याच आधारावर खेळाडूंची निवड केली गेली आहे.”
इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघ
शाय होप (कर्णधार), अल्जारी जोसेफ (उपकर्णधार), एलिक अथानाजे, यानिक कारिया, कीसी कार्टी, रॉस्टन चेज, शेन डाउरिच, मॅथ्यू फोर्ड, शिमरॉन हेटमायर, ब्रेंडन किंग, गुडाकेश मोती, केजोर्न ओटले, शेर्फेन रुदरफोर्ड, रोमारियो शेफर्ड आणि ओशाने थॉमस (west indies former cricketer dwayne bravo darren bravo west indies cricket team odi squad wi vs eng when will the bs stop)
हेही वाचा-
हैदराबाद विमानतळावर झाली सिराज अन् अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची भेट; म्हणाल्या, ‘तुम्ही जिद्दीने आणि…’
CWC 2023 । वॉर्नर अजून संपला नाही, निवृत्तीचा अंदाज वर्तवल्यानंतर दिग्गजाने एकदाचे स्पष्टचं करून टाकले