• About Us
  • Privacy Policy
सोमवार, ऑक्टोबर 2, 2023
  • Login
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result

जेव्हा Insta DMमध्ये ब्रायन लाराचा मेसेज पाहून दंग झालेला ईशान, दिग्गजापुढेच सांगितला भावूक किस्सा

जेव्हा Insta DMमध्ये ब्रायन लाराचा मेसेज पाहून दंग झालेला ईशान, दिग्गजापुढेच सांगितला भावूक किस्सा

Atul Waghmare by Atul Waghmare
ऑगस्ट 3, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
0
Brian-Lara-And-Ishan-Kishan-And-Shubman-Gill

Photo Courtesy: Twitter/BCCI


वेस्ट इंडिज संघाला कसोटीपाठोपाठ वनडे मालिकेवरही पाणी सोडावे लागले. यजमान वेस्ट इंडिज संघाने भारताविरुद्ध आधी कसोटी मालिका 1-0ने आणि आता वनडे मालिका 2-1ने गमावली. भारतीय संघाने वनडे मालिकेतील अखेरचा म्हणजेच तिसरा सामना तब्बल 200 धावांनी जिंकत ही मालिका नावावर केली. या मालिकेतील तिन्ही सामन्यात भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन याची बॅट तळपली. त्याने मालिकेत सर्वाधिक 184 धावा करण्याचा मान मिळवला. त्यामुळे ईशान किशन मालिकावीर पुरस्कार पटकावू शकला. तसेच, अखेरच्या सामन्यात शुबमन गिल याचीही बॅट तळपली. गिललाही सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. सामन्यानंतर वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लारा याने दोघांची भेट घेतली.

तिसऱ्या वनडेत भारतीय संघाने विजयी पताका फडकवल्यानंतर बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत ब्रायन लारा ईशान किशन (Brian Lara Ishan Kishan) आणि शुबमन गिल (Shubman Gill) यांची मुलाखत घेताना दिसला. यादरम्यान ईशान किशन (Ishan Kishan) याने सांगितले की, जेव्हा ब्रायन लारा (Brian Lara) यांनी त्याला इंस्टाग्रामवर मेसेज केला होता, तेव्हा तो हैराण झाला होता.

ईशानचे वक्तव्य
ईशानने या मुलाखतीदरम्यान लारासोबत बोलताना म्हटले की, “तुमच्याबाबत जी कहाणी मी नेहमी ऐकली, ती ही आहे की, जर तुम्ही लंचदरम्यान नाबाद राहायचात, तेव्हा तुम्ही लगेच सराव करायला जात असायचा. त्यानंतर थेट येऊन तुम्ही फलंदाजी करायला सुरुवात करत होता. ही एक गोष्ट तुमच्याकडून नक्कीच शिकली पाहिजे. याव्यतिरिक्त मी आणखी एका गोष्टीसाठी खूपच उत्सुक आहे. जेव्हा तुम्ही मला इंस्टाग्रामवर मेसेज केला होता. त्यावेळी मी हैराण झालो होतो की, तुम्ही मला मेसेज केला आहे आणि मी खूपच खुश झालो होतो.”

या संभाषणादरम्यान ईशानने पुढे सांगितले की, “इथे खेळणे आणि तुमचे नाव असणाऱ्या मैदानावरील प्रदर्शन आमच्यासाठी खूपच खास आहे. मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो की, मला तुमच्या खेळीच्या हायलाईट्स पाहायला खूप आवडतात.”

All ears when the 𝗣𝗿𝗶𝗻𝗰𝗲 𝗼𝗳 𝗧𝗿𝗶𝗻𝗶𝗱𝗮𝗱 speaks 🗣️

𝘿𝙊 𝙉𝙊𝙏 𝙈𝙄𝙎𝙎 – @BrianLara in conversation with @ShubmanGill & @ishankishan51 at the Brian Lara Stadium, Trinidad👌👌 – By @ameyatilak

Full Conversation – https://t.co/xWbvEz9kjU #WIvIND pic.twitter.com/AOLgonqyGE

— BCCI (@BCCI) August 2, 2023

‘तुम्ही पहिल्या चेंडूपासून गोलंदाजावर दबाव बनवून ठेवायचा’
तिसऱ्या वनडेत सर्वाधिक धावा करणारा शुबमन गिल (Shubman Gill) यानेही संभाषणादरम्यान म्हटले की, “माझ्या तुमच्याशी संबंधित आठवणी आहेत, त्यात तुम्ही पहिल्या चेंडूपासूनच गोलंदाजांवर दबाव बनवायचात. लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला खेळताना पाहणे खूपच शानदार होते. हे सर्व माझ्यासाठी कोणत्याही प्रेरणेपेक्षा कमी नव्हते की, तुम्ही कशाप्रकारे सर्व क्रिकेट प्रकारात शानदार कामगिरी करू शकता.”

अखेरच्या वनडेत चमकले युवा फलंदाज
तिसऱ्या वनडेत भारतीय संघ प्रथम फलंदाजीला उतरला होता. यावेळी भारताकडून ईशान किशन (77), शुबमन गिल (85), हार्दिक पंड्या (नाबाद 70), संजू सॅमसन (51) आणि सूर्यकुमार यादव (35) यांनी शानदार फटकेबाजी केली. यांच्या जोरावर भारताने 50 षटकात 5 विकेट्स गमावत 351 धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाचा डाव 35.3 षटकातच 151 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे भारतीय संघाला 200 धावांनी विजय मिळवण्यात यश आले. यावेळी भारताकडून गोलंदाजी करताना शार्दुल ठाकूर आणि मुकेश कुमार चमकले. शार्दुलने 4, तर मुकेशने 3 विकेट्स नावावर केल्या. तसेच, कुलदीप यादवने 2, तर जयदेव उनाडकट यानेही 1 विकेट नावावर केली. (west indies great brian lara interviewed indian cricketer ishan kishan and shubman gill see video)

महत्त्वाच्या बातम्या-
मालिका विजयासह Team Indiaचा वेस्ट इंडिजविरुद्ध विश्वविक्रम, प्रत्येक भारतीयाला वाटेल अभिमान
कधी, कुठे आणि कसा पाहायचा भारत-वेस्ट इंडिज संघातील पहिला टी20 सामना? एका क्लिकवर घ्या जाणून


Previous Post

मालिका विजयासह Team Indiaचा वेस्ट इंडिजविरुद्ध विश्वविक्रम, प्रत्येक भारतीयाला वाटेल अभिमान

Next Post

टी20 मालिकेत ‘या’ 5 भारतीय धुरंधरांवर असेल आख्ख्या जगाचे लक्ष, सुपरफॉर्ममधील खेळाडूकडून विंडीजला धोका

Next Post
Kuldeep-Yadav-And-Hardik-Pandya-And-Suryakumar-Yadav

टी20 मालिकेत 'या' 5 भारतीय धुरंधरांवर असेल आख्ख्या जगाचे लक्ष, सुपरफॉर्ममधील खेळाडूकडून विंडीजला धोका

टाॅप बातम्या

  • ‘आम्ही सचिनसोबत जे केलं ते…’, विराट कोहलीचं नाव घेत सेहवागचे मोठे विधान
  • विराट विश्वचषकात सर्वाधिक धावा करणार! जवळच्या मित्राने दिली हमी
  • SNBP Hockey । राऊंड ग्लास अकादमीचा २७ गोलने दणदणीत विजय, पहिल्याच दिवशी स्पर्धेत ६४ गोलांची नोंद
  • ‘या’ कारणास्तव भारत जिंकणार वनडे विश्वचषक, इंग्लंडला ‘या’ गोष्टीचा तोटा, ब्रॉडची भविष्यवाणी
  • Asian Games 2023 । तजिंदरपालने सलग दुसऱ्यांदा जिंकले सुवर्ण, अविनाश साबळेनेही रचला इतिहास
  • दरियादिल सॅमसन! वर्ल्डकप स्कॉडमध्ये वगळळ्यानंतरही खचला नाही, पाकिस्तानी अष्टपैलूसोबत खळखळून हसला
  • रोहितचा चाहता बनला पाकिस्ताचा 24 वर्षीय अष्टपैलू, विश्वचषकापूर्वी केलं तोंड भरून कौतुक
  • वर्ल्डकपमधील सर्वात यशस्वी संघ टॉप 4मध्ये पोहोचला, तर…, भारतीय दिग्गजाने कुणाविषयी केले भाष्य?
  • VIDEO: हॉकीच्या मैदानावर क्रिकेटपटूंनी वाढवला हौसला! हरमन सेनेने चिरडले पाकिस्तानचे आव्हान
  • वर्ल्डकपआधी विदेशी दिग्गजाने गायले श्रेयसचे गुणगान, म्हणाला,‌”तो टीम इंडियाचा…”
  • दु:खद! भारतात आलेल्या ‘या’ पाकिस्तानी खेळाडूच्या जवळच्या व्यक्तीचे निधन, कुटुंब शोकसागरात
  • विश्वचषक 2011मध्ये सचिनने दिलेला ‘विमानतळावर हेडफोन घालण्याचा’ सल्ला, युवराजचा खुलासा
  • इतिहास ODI World Cupमधील पहिल्या सामन्यांचा, वाचा सर्वाधिक वेळा कुणाच्या पदरी पडलाय विजय
  • अश्विनच्या ‘डुप्लिकेट’ने धुडकावून लावली ऑस्ट्रेलियाची ऑफर, वर्ल्डकपमध्ये मदत करण्यास दिला नकार
  • World Cupपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या स्टार खेळाडूची केरळस्थित जगातील सर्वात श्रीमंत मंदिराला भेट, फोटो व्हायरल
  • ‘मला वाईट वाटतंय, पण मला दुर्लक्षित…’, विश्वचषकातून ड्रॉप होण्याविषयी चहलने व्यक्त केली हळहळ
  • कहर! 10 पैकी ‘हा’ एकटा संघ 12 वर्षांनंतर खेळणार वर्ल्डकप, फक्त ‘एवढ्या’ वेळा घेतलाय भाग
  • वर्ल्डकपला उरले फक्त 4 दिवस, जाणून घ्या बलाढ्य भारत 9 संघांविरुद्ध कधी-कधी भिडणार
  • World Cupमधील पहिल्या सामन्यात उतरताच विराट करणार ‘हा’ भीमपराक्रम, यादीतला टॉपर सचिन तेंडुलकर
  • विश्वचषकापूर्वी पाऊस जिंकतोय सराव सामने, ऑस्ट्रेलिया-नेदर्लंड लढत अर्ध्यात सुटली
  • About Us
  • Privacy Policy

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In