वेस्ट इंडिजमध्ये अनेक दिग्गज क्रिकेटपटू होऊन गेले आहेत, ज्यांनी आपल्या जबरदस्त फलंदाजीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. या फलंदाजांपैकी एक म्हणजेच सर विवियन रिचर्ड्स होय. रिचर्ड्स हे जगातील एकमेव असे क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी क्रिकेट आणि फुटबॉलचा विश्वचषक खेळला आहे. विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखले जाणारे रिचर्ड्स यांना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपला आदर्श मानतो. ८० च्या दशकात जेव्हा रिचर्ड्स जेव्हा तोंडात च्युइंग गम चावत आणि विना हेल्मेट क्रीझवर उतरायचे, तेव्हा गोलंदाजही गोलंदाजी करण्यास घाबरायचे. गोलंदाजांची लय बिघडवण्यात पटाईत असलेले रिचर्ड्स यांच्या फलंदाजीचे चाहते फक्त वेस्ट इंडिजमध्ये नाही, तर संपूर्ण जगभरात होते. रिचर्ड्स यांनी सोमवारी (७ मार्च) आपला ७० वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्याबद्दलच्या खास गोष्टी…
विवियन रिचर्ड्स (Vivian Richards) यांचा जन्म १९५२ साली एँटिगाच्या सेंट जोन्स शहरात झाला आहे. डावखुरे फलंदाज रिचर्ड्स यांनी ३०० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. १९७४ साली रिचर्ड्स एँटिगासाठी फिफा विश्वचषक पात्रता फेरीतील सामने खेळले होते. विश्वचषकात ८० ते ९० च्या दशकात जेव्हा गोलंदाजांचा बोलबाला होता, त्यावेळी रिचर्ड्स यांनी आपली वेगळी ओळख बनवली होती. त्यांनी १९७४ ते १९९१ दरम्यान आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले होते.
नोव्हेंबर १९७४मध्ये भारताविरुद्ध बंगळुरूमध्ये आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या रिचर्ड्स यांनी १२१ कसोटी सामन्यात २४ शतके आणि ४५ अर्धशतकांच्या मदतीने ८५४० धावा केल्या आहेत. त्यात २९१ धावा ही त्यांची सर्वोत्तम धावसंख्या आहे. रिचर्ड्स यांनी यादरम्यान ५० पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडला आहे. १८७ वनडे सामन्यांमध्ये त्यांनी एकूण ४७ च्या सरासरीने ६७२१ धावा केल्या आहेत. त्यामध्ये ११ शतके आणि ४५ अर्धशतके केली आहेत. वनडेत रिचर्ड्स यांनी ९०.२०च्या स्ट्राईक रेटने या धावा ठोकल्या आहेत.
रिचर्ड्स यांची १८९ धावांची ऐतिहासिक खेळी
रिचर्ड्स यांची नाबाद १८९ धावांची खेळी वनडे क्रिकेटमध्ये दीर्घकाळ कायम राहिली. १९७९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात रिचर्ड्स यांनी १३८ धावांची खेळी केली होती. रिचर्ड्स यांनी वेस्ट इंडिजकडून ४ विश्वचषक (१९९५, १९७९, १९८३, १९८७) खेळले.
रिचर्ड्स आहेत सचिन तेंडुलकरचे आदर्श
‘मास्टर ब्लास्टर’ म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकरला युवा खेळाडू आपला आदर्श मानतात. मात्र, सचिन हा रिचर्ड्स यांना आपला आदर्श मानतो. यापूर्वी रिचर्ड्स यांच्यामुळे सचिन त्यांच्या विस्फोटक फलंदाजीवर फिदा होता. सचिनने अनेकदा हे मान्य केले आहे की, बचावात्मक खेळी करताना त्याचा आदर्श सुनील गावसकर होते. मात्र, जेव्हा विस्फोटक फलंदाजीच्या वेळी रिचर्ड्स हे त्याचे आदर्श असायचे.
रिचर्ड्स हे दोन वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्ट इंडिज संघाचे कर्णधारही राहिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
वाढदिवस विशेष: जेव्हा विवियन रिचर्ड्स यांनी कराचीतील मैदानावर आणले होते तुफान
ऑस्ट्रेलियाचा स्मिथ ठरला सचिनला वरचढ! १५० कसोटी डावांत केलाय कोणालाही न जमलेला पराक्रम
‘त्या’ सीनियर पीच क्यूरेटरवरचे आरोप ठरले खरे; शास्त्रींविरोधात जाऊन सोडली होती ऑर्डर