वेस्ट इंडिज संघाचा माजी वेगवान गोलंदाज पॅट्रिक पॅटरसन हे आपल्या काळात आपल्या धारदार वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध होते. वेस्ट इंडीज संघासाठी १९८०-९० च्या दशकात क्रिकेट खेळणाऱ्या या क्रिकेटपटूचे आता दोन वेळच्या जेवणासाठीही हाल होत आहेत.
प्रसिद्ध लेखक आणि क्रिकेट ॲनलिस्ट भारत सुंदरसन यांनी ही माहिती दिली आहे. सुंदरसन यांनी ट्विट करत लिहिले की, ‘पॅट्रिक पॅटरसन यांची दिवसेंदिवस परिस्थिती खराब होत चालली आहे. ते सध्या किराणा सामान खरेदी करण्यात आणि दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात अक्षम आहेत. आम्ही त्यांच्यासाठी हे @gofundme सेट केले आहे. त्यांच्या वतीने क्रिकेट समुदायाची ही याचिका आहे. कृपया तुमचे प्रेम द्या.’
हे ट्विट पाहून भारतीय संघाचा फिरकीपटू आर अश्विन देखील भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. त्याने ट्विट करत लिहिले की, ‘महान पॅट्रिक पॅटरसनला त्यांचे दैनंदिन जीवन चालविण्यासाठी मदतीची आवश्यकता आहे. भारतीय चलनात पैसे देण्याचे कोणतेही पर्याय नाहीत. जर कुणाला मदत करता येत असेल तर कृपया करा.’
Patrick Patterson the great needs help for his daily survival, there are no options to pay in Indian currency. If someone can help, please do so. ???? https://t.co/z1KDurk65M
— Ashwin ???????? (@ashwinravi99) May 20, 2021
पॅट्रिक पॅटरसन यांची कारकीर्द
वेस्ट इंडिज संघासाठी १९८०-९० चे दशक गाजवणाऱ्या ५९ वर्षीय दिग्गज गोलंदाज पॅट्रिक पॅटरसन यांनी आपल्या कारकीर्दीत २८ कसोटी सामने खेळले. यात त्यांना ९३ गडी बाद करण्यात यश आले होते. तसेच त्याने ४ वेळेस ४ पेक्षा अधिक गडी बाद केले होते. तर ५ वेळेस ५ पेक्षा अधिक गडी बाद केले होते. यासोबतच २४ धावा खर्च करत ५ गडी बाद ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. वनडे क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी ५९ सामने खेळले होते. यात त्यांना ९० गडी बाद करण्यात यश आले आहे. यात २९ धावा देत ६ गडी बाद ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडिया पुढच्या वर्षी खेळणार पाकिस्तानात क्रिकेट? ‘या’ कारणामुळे करावा लागू शकतो दौरा